Ad will apear here
Next
‘शिक्षणातील बदलते प्रवाह जाणून घेणे गरजेचे’
‘स्पेशल विंटर स्कूल’च्या कोर्सच्याउद्घाटनाप्रसंगी बोलताना डॉ. विजय नारखेडेबारामती : ‘पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची या शैक्षणिक युगात निकड भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पिढीतील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण देणे हे आजच्या शिक्षकाचे कर्तव्य आहे. हा बदल करण्यासाठी प्राध्यापकांनी शिक्षण क्षेत्रात बदलत असलेले प्रवाह जाणून घेणे गरजेचे आहे,’ असे मत पुणे विभागाचे उच्च शिक्षण सह संचालक डॉ. विजय नारखेडे यांनी व्यक्त केले. 

अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती आणि एचआरडीसी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालायात प्रथमच ‘स्पेशल विंटर स्कूल’च्या कोर्सचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत हा कोर्स सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी भूषविले.

डॉ. नारखेडे पुढे म्हणाले, ‘नव्या युगात आयसीटी (ICT) चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच जाणीवेतून विद्यार्थ्यांना शिकवताना अध्यापन पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहे. अधिकाधिक ‘आयसीटी’चा वापर करून विद्यार्थ्यांना घडवणे काळाची गरज आहे. या कोर्सचा अधिकतर लाभ शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्राध्यापकांनी पोहचवला पाहिजे.’ टी. सी. महाविद्यालयाने हा बदलता काळ योग्यवेळी ओळखून वेगवेगळे कौशल्यपूर्ण कोर्सेसची सुरुवात महाविद्यालयात केल्याबद्दल त्यांनी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांचे अभिनंदन केले.

प्राचार्य डॉ. मुरुमकर यांनी या विंटर स्कूलच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले की, ‘आजच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात सर्वच अत्यंत जलदगतीने बदलत आहे. आपण सर्व वैज्ञानिक आणि तांत्रिकदृष्ट्या एका संक्रमण काळातून जात आहोत. समाजाप्रमाणेच आपला मुख्य लक्ष्यगट म्हणजे विद्यार्थी हा सुद्धा तांत्रिकदृष्ट्या बदलत आहे किंबहुना आजची पिढी अधिकच तंत्रकुशल झालेली आहे. हा बदल त्यांच्यानुसार आपणही अंगीकारणे गरजेचे झाले आहे. या नव्या पिढीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच युगातील संसाधनांचा वापर करून आधुनिक अध्यापन पद्धतीने शिक्षण दिले पाहिजे.’ हा रिफ्रेशर आणि ओरीइंटेशन कोर्स निश्चितच सहभागी प्राध्यापकांना यासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी या विंटर स्कूलचे समन्वयक डॉ. मिलिंद गजभिये यांनी या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. या कोर्ससाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून देखील एकूण ८५ प्राध्यापकांनी प्रवेश अर्ज सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शिवाजी साठे, डॉ. अविनाश जगताप, डॉ. अजित तेलवे, डॉ. सचिन गाडेकर उपस्थित होते. डॉ. योगिनी मुळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अजय ढवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTDBG
Similar Posts
व्यक्तिस्वातंत्र्य हा मूलभूत हक्क : डॉ. रझिया पटेल बारामती (पुणे) : 'स्त्री आणि पुरुष ही मानवी व्यक्तिमत्वाचे दोन अविभाज्य भाग आहेत. ते दोन्ही समसमान आहेत याची जाणीव आजच्या युगातल्या युवकांना असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य हा त्याचा मूलभूत हक्क आहे,' असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रझिया पटेल यांनी व्यक्त केले. तुळजाराम चतुरचंद
राष्ट्रीय आयोगाच्या तज्ञ समिती सदस्यपदी प्रा. विनायक लष्कर बारामती (पुणे) : प्रा. विनायक सुभाष लष्कर यांची राष्ट्रीय विमुक्त, भटक्या आणि निम्नभटक्या जाती-जमाती आयोगाच्या तज्ज्ञ समिती सदस्यपदी (कार्यगट) नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगात एकूण आठ कार्यगट असून, प्रा.लष्कर हे त्यापैकी तीन गटांचे सक्रिय सदस्य आहेत. या कार्यगटांमध्ये भटक्या-विमुक्त जमातीमधील स्त्रियांचे
बारामती येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात पुणे : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त बारामती येथे तालुका प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच म. ए. सोसायटीचे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने योगदिनाचा कार्यक्रम म. ए. सोसायटीच्या मैदानावर घेण्यात आला.
इंदापूर व दिव्यातील शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश बारामती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची दिवे येथील (ता. पुरंदर) शासकीय निवासी शाळा, तसेच तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील शासकीय निवासी शाळा येथे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language